मार्गदर्शक
मार्गदर्शक
1 min
193
माझ्या डोळ्यांना दिलीत शिक्षित दृष्टी,
पहायला शिकवलीत सजगपणे सृष्टी.
शोधायला शिकवलात प्रत्येक श्वासाचा अर्थ,
उमजून दिलेत समजून जगणे सार्थ.
द्यायला शिकवली शाळेबरोबर जीवनाची परीक्षा,
सर्वांगीण विकासाने विस्तारलीत ज्ञानाची कक्षा.
आईसह सर्व गुरूंना माझे शतशः नमन,
शब्दातीत उपकारांना पाकोळीचे अंशतः स्तुतिसुमन!
