STORYMIRROR

Tushar Chandrakant Mhatre

Others

3  

Tushar Chandrakant Mhatre

Others

मानवी हस्तक्षेप

मानवी हस्तक्षेप

1 min
11.7K

खळखळत्या नितळ जलात

अडखळता कचरा आला

सृष्टीच्या सुंदर रचनेत

मानवी हस्तक्षेप झाला


अधाशी उद्योगांची भुते

जेव्हा आधारभुत झाली

 सृजनकर्ती सरिता तेव्हा

जमिनीत लुप्त झाली,


तुटून पडल्या फांद्या तरी

पालवी नवी येऊदे

नव्या दिवसाच्या प्रभेला

पुन्हा निसर्ग बहरु दे!


Rate this content
Log in