STORYMIRROR

Manisha Potdar

Others

3  

Manisha Potdar

Others

माणूसपण

माणूसपण

1 min
340

महराष्ट्राचे देव, सण, उत्सव, यात्रा

यात दिसते आपली सुंदर संस्कृती

म्हसोबा, खंडोबा, रोकडोबा,बैरोबा

भालदेव, कानबाई, रानबाई उत्सव येती ॥१॥


धनधान्य,दुधदुप भरपुर येती घरा

शेतकरी राजा देतो जीवाला आकृती

होऊन गेला शिवाजी राजा आमचा

होता न्यायी, सुसंस्कृत, सुनीती, सुमती ॥ २ ॥


जगा आणि जगू दया असा बाणा

संताची भुमी महाराष्ट्राची प्रकृती

महात्मा जोतीबा, बाबा आमटे, भीमरावा,

गाडगे महाराज, पुन्हा यावी प्रतिकृती ॥ 3 ॥


नरसोबाची वाडी, गुरूदेव दत्ता

सप्तशृंगीची माता हीच संस्कृती

कुणी मुर्खाने चालु केली बळीची प्रथा

बंद होईल कधी माणसाची ही विकृती ॥ ४ ॥


अतिथी देवोभवो, मातृपितृ देवोभवो

पुंडालिकाला भेटली विठ्ठल संस्कृती

निवृत्ती, नामदेव, सोपान, मुक्ताई

एकनाथ, तुकाराम संताची संस्कृती ॥ ५ ॥



Rate this content
Log in