Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Medha Desai

Others

3  

Medha Desai

Others

माणूस म्हणून

माणूस म्हणून

1 min
11.9K


कवी मनाचा माणूस म्हणून 

तो प्रगल्भ विचारांनी भारावला

वाचन,लेखनाचा छंद जोपासल्यावर

ज्ञानाचे भांडार पाहून मनोमनी सुखावला १


डाॅक्टर,सफाई कामगार,पोलीस, परिचारिका

सारे देव माणूस म्हणून देशसेवा करतात

कोरोनाच्या रुग्णांची मायेने सेवा करून

जीवनातील महान कार्य पार पाडतात २


आईने दिलेले मानव जन्माचे आयुष्य

आधी माणूस म्हणून नीट जगून घ्यावे

नंतर कोणता जन्म मिळेल माहीत नाही

मग चांगले भविष्य घडवून जीवन तडीस न्यावे ३


माणूस म्हणून जगताना पाहिले

काही वेळा माणुसकीच हरवली

नराधमांच्या क्रूर विळख्यात अडकून

स्त्रीची विटंबना होताना दिसली ४


जेव्हा माणूस म्हणून गहिवर येतो

तेव्हा दानधर्म,सेवाभावाचा मार्ग दिसतो

जिव्हाळा,आपुलकीने तेव्हा जीव सुखावतो

आणि तो माणसातील देवत्वाचा भास असतो ५


माणसात षड्रीपू दडलेले असतात

ते डोके कधी वर काढतील माहीत नाही

पण आस,इच्छा सर्वांनाच असल्याने

मोहावर नियंत्रण ठेवणे चांगले राही ६


खरे तर माणूस आहे म्हणूनच

तो नेहमी चुका करत असतो

शंभर टक्के कुणीही बरोबर नसते

पण माणूस दुसऱ्यांकडेच आधी बोट दाखवतो ७


माणूस आहे म्हणून तो मर्त्य आहे

मग आहे तेव्हा आनंदाने जगून घ्यावे

सारे माझे माझे करत बसण्यापेक्षा

मित्रत्वाने, माणुसकीने जगत रहावे ८


शेवटी प्रत्येकाला सरणावर जावेच लागणार

मग माणूस म्हणून माणसाप्रमाणे जगून घ्यावे

सदाचार,सत्कर्म,सन्मार्गाने कर्तव्य करून

आयुष्य सारे सेवाभावाने समृद्ध करावे ९


Rate this content
Log in