माणुसकी
माणुसकी
1 min
215
परवा एक जण
असाच रस्त्यात भेटला
कोरोनाच्या भीतीने
मास्कच्या आङुन हसला
मलाही चेहरा जरा
ओळखीचा वाटला
भाजीपाला घेतांना
त्याचा मुलगा म्हटला
पपा, मला चप्पल घ्या
बघा, हयाचा अंगठा तुटला
जाणवल मला तेव्हाच
खिशाकङे हात नेऊन
चेहरा त्याने पुसला
माझी चप्पल तिथेच ठेवुन
मी आधी घराचा
कोपरा होता गाठला
मास्क असला तरी
माणुसच होता ना भेटला.
