STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

2  

Sushama Gangulwar

Others

माणुसकी

माणुसकी

1 min
259

लाजवेल देवाला ही 

वृत्ती झाली माणसांची 

स्वतः श्रेष्ठ जगतात 

गौण भाव इतरांशी 


माझं तुझं म्हणण्यात 

माणुसकी हरवली 

अहंकार मी पणाचा 

माणसाने मिरवली 


प्रेम जाणून न घेता 

द्वेष मनात जागली 

कित्येकांच्या भावनांना 

शीळ मनात लागली 


कोण मोठे कोण छोटे 

यात आयुष्य सांडले 

निरर्थक गोष्टींसाठी 

रक्त रक्ताला भांडले


व्यक्त करावे भावना 

जग जिंकावे प्रेमाने 

पैसा नसेल जवळ 

व्हावे श्रीमंत मनाने 


समाजात वावरावे 

माणुसकी न सोडता 

नाते जपावे पूर्णतः 

मन कधी न तोडता 


Rate this content
Log in