माणसे ओळखायला शिका
माणसे ओळखायला शिका
दुनियेत दुनियेतील लोकांसोबत
त्यांच्यासारखं राहायला शिका
ह्या जगात कोणी कोणाचं नसतं,
हे कटू सत्य स्वीकारायला शिका...
दुसऱ्यातील दोष दाखविण्यापेक्षा
स्वतः बदल करायला शिका
तुम्ही इतरांना बदलणारे कोणी नाही
हे कटू सत्य स्वीकारायला शिका..
जुने ते सोने असतील तरी
नव्याची जोड लावायला शिका
आपल्या माणसात आपलं कोणी नाही
हे कटू सत्य स्वीकारायला शिका..
दुसऱ्याचा विचार करताना
स्वतःचे विचार जगात मांडायला शिका
जोर जबरदस्ती नाही तर
प्रेमाने बोलायला शिका..
जगात सगळेच वाईट नसतात
त्यांच्या बरोबर मैत्री करायला शिका
आपल्यातल्या आपल्यांना ओळखून
आपली माणसे ओळखायला शिका..!
