माणसाचा देव व्हावा
माणसाचा देव व्हावा
1 min
132
संपू दे अंधार सारा,
उजळू दे आकाश तारे,
गंधाळल्या पहाटे येथे,
वाहू दे आनंद वारे.....
जाग यावी सृष्टीला की,
होऊ दे माणूस जागा,
सृष्टी सारे नष्ट व्हावे,
घट्ट व्हावा प्रेम धागा.....
स्वच्छ सारे मार्ग व्हावे,
अन् मने ही साफ व्हावी,
मोकळया श्वासात येथे,
जीवसृष्टी जन्म घ्यावी.....
स्पंदनाचा अर्थ येथे,
एकमेकांना कळावा,
ही सकाळ रोज यावी,
माणसाचा देव व्हावा.....
