STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

मांजा...!

मांजा...!

1 min
353

जीवघेणा चायनीज मांजा....काल संध्याकाळी राजरामपूरीत पायात मांजा अडकला आणि चालताना पाठोपाठ चपलात अडकून येऊ लागला. काही केल्या लाईटच्या प्रकाशात दिसेना, थोडे निरखून पाहिल्यावर दिसला आणि जवळ जवळ दहा मिनिटे रस्त्याकडेला उभे राहून तो मांजा मी माझ्या हातात गुंडाळून घेतला. गाडीच्या चाकात वगैरे अडकून दुर्घटना होवू नये इतकाच विचार केला. ज्यांना कोणाला असा मांजा दिसेल किंव्हा पायात अडकले त्यांनी तो थोडा वेळ घालवून गोळा करावा जेणेकरून भावी दुर्घटना टाळण्यास हातभार लावण्याचे समाधान मिळेल आणि दुर्घटनाही टळेल....! मुलांनी पण असा घातक मांजा पतंगासाठी वापरू नये ही विनंती...!


मांजा रातीला पायी अडकला

फरफटत पाया लागून आला

काळा कभिन्न मेला चिवट साला

त्याने माझ्या गतीस रोडा घातला...

विचार तंद्रीत मी जाता जाता

विचार धारा खुंटली मांज्या पायी

म्हंटले मनाशीच मग मी

नको कराया आता घायी....

क्षणभर थांबुन हातावरी गुंडाळला

चांगला तीस पत्तीस मीटर भरला

ज्याने माझा वेळ फुकाचा

जाता जाता उगाच खाल्ला....

घातक तो चिवट मांजा

चायनीज म्हणून मी मद्दाम गोळा केला

ब्याद टाळण्या मग तो मी

जाता जाता कचरा टोपलीत टाकला....

पतंगाची हौस भागवावी

वापरून रे सुती मांजा आपला देशी

जो सहजी नेईल पतंग आकाशी

नका वापरू तो घातक मांजा परदेशी...

जो चिवट चायनीज मांजा

हात कापतो अनर्थ घडवितो कधी कधी

करावा की विचार साधा मनाशी

चांगल्या वाईटाचा कृती करण्याआधी....

जाता जाता शुभेच्छा देता

इतुकेच मज सांगावे वाटते

दुर्घटनेआधी काळजी घेणे

हेच सदैव चांगले असते....!

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...


Rate this content
Log in