मान वळवून
मान वळवून
1 min
214
मान वळवून
मोबाईल नेटवर्क रेंज शोधत होते
कधी ह्या कोपर्यात
तर कधी त्या कोपर्यात
मान वळवून वळवून
रेंज शोधत फिरत होते
कधी मान वळवून वर बघ
तर कधी खाली बघ
दाही दिशा फिरले
मोबाईल रेंज शोधण्या
मोबाईल रेंज हाती लागली नाही..
पण काय चमत्कार
डोळे खाडकन उघडले
मान वळवून वर बघता
निळे, रंगीबीरंगी आकाश खूणवत होते
कानातला हेडफोन काढून टाकताच
पक्ष्यांचा सुमधूर आवाज घुमला
मग काय
आता रेंज थेट निसर्गाशी जुळली !!
