STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

माझ्या सुंदर फुलानो-गीत.

माझ्या सुंदर फुलानो-गीत.

1 min
28.1K


माझ्या सुंदर फुलानो

तुमचं काम आहे जोमानं

माझ्या हिंद बांधवानो

माझ्या देशबांधवांनो


नाही मागे तुम्ही हटायाचे

देशद्रोही विरुद्ध लढायचे

हे जीवन कामास लावायचे

सत्य युग आणायचे


जीवन सत्याने जगायचे

अन्यायविरुद्ध ठाकायचे

फास बंधनाचे तोडायचे

जीवघेने विचार सोडायचे


झेप नव्या युगाची

संदेश खूप शिकण्याची

तरुण पिढीने घेण्याची

व्यसनातून मुक्त होण्याची

लोभी वृती सोडण्याची


समाधानी जीवन जगण्याची

निराधाराना सोबत घेण्याची

त्यांचे जीवन सुधारण्याची

शक्ती निर्माण देश भक्तीची

आदर्श पिढी घडण्याची

आदर संतांचा राखण्याची

भारत स्वछ करण्याची


हाती सत्याची मशाल

प्रगतीची वाटचाल

या विशाल देशात

विचार चारी दिशात


लोकसेवेला लागायचे

नाही माघारी फिरायचे

जीवन कामास लावायचे

श्रमाचे मोल करायचे


आहे युवा शक्ती तुझ्यात

नवा इतिहास घडविण्यात

नाते मानवाचे जोडण्यात

भारत संस्कारी करण्यात .


Rate this content
Log in