माझ्या मनातील वेदना
माझ्या मनातील वेदना
सांगता ही येत नहीं,
बोलता ही येत नहीं,
कसा रे माझ्या मना तू ,
धळ तुला स्वतःच मन सुद्धा ,
मोकळं ही करता येत नहीं .... |ध्रु||
सांग ना रे माझ्या मना ??
जपून जपून तरी किती ,
वेदना जपून ठेवशील,,
एक दिवस असा येईल की,
ती वेदना पिशवीसुद्धा फाटून जाईल,
तेव्हा तु तुझ्या वेदना ठेवाला ,
तरी कुठे जाशील ??..||१||
सांग ना रे माझ्या मना ??
तू तुझ्या वेदनाच करशील तरी काय ??
मनुष्य म्हणतात दुसऱ्याकडे मन मोकळे केल्याने ,
वेदना होतात थोड्या कमी ,
तुला काय वाटते रे, होतील का रे कमी ??
सांग ना रे माझ्या मना ??
होतील का रे वेदना कमी ??
होतील का रे वेदना कमी ????.... ||२||
सांग ना रे माझ्या मना??
सांगून सांगून किती वेदना सागशील ,
तू या मुखवटी माणसाला ,,
एक दिवस असा येईल की ,
तो ही तुझ्या वेदनाच ,,
खेळ मांडेल चारी दिशेला ,
खेळ मांडेल चारी दिशेला.. ||३||...
सांग ना रे माझ्या मना ??
या जगात तुझ्या वेदना ,
कमी करेल असे आहे का रे कोणी ??
ज्याच्या कडे बोलून तुझ्या वेदना ,
होतील थोड्या फार कमी ,,
सांग ना रे माझ्या मना ,
होतील कारे तुझ्या वेदना कमी ??
होतील कारे तुझ्या वेदना कमी ??.... ||४||
