STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

4  

Deepa Vankudre

Others

माझ्या कवितेचा आशय

माझ्या कवितेचा आशय

1 min
386

हा माझ्या कवितेचा आशय,

ती फुलात फुलते, हसते,

दवात थिजते, विरते,

ती वाऱ्यासम मुक्त उधळते,


ती सूर्यासोबत उगवते, 

ती निशांत येता निजते, 

ती वसुधेला सजवते, 

ती निसर्गास बहरवते!


हा माझ्या कवितेचा आशय, 

ती माणसात जीव जागवते, 

ती स्नेह वाटून साठवते, 

ती प्रेमाचा ओज पसरवते, 

ती मंदिरातली ज्योत तेवते!


Rate this content
Log in