माझ्या कविता
माझ्या कविता
1 min
235
....ती हजारो वर्षांपासून कोरड्या
जमिनीवर पडलैले चार थेंब पाणी असते...
तर कधी सर्वात आवडती असावी
अशी पट्टराणी असते....
....खर पाहता कविता काहिच नसते
पण एका कविसाठी ती खुप काहि असते...
....काहि लोक म्हणतात माझे
कविता करणे टाईमपास तर
काहि म्हणतात तुझ्या कविता
एकदम छान असतात...
...खर पाहता त्या बुध्दीरुपी
धनुष्यातुन निघणारे तिक्ष्ण
बाण असतात....
....माझ्या कविता तर
टिकाकारांना केलेला
छुपा वार असतो ...
माझ्या कविता तर मानवी जिवनाचा
खुप कमी शब्दातला सार असतो......
