STORYMIRROR

Deore Vaishali

Others

3  

Deore Vaishali

Others

माझ्या जीवनात...

माझ्या जीवनात...

1 min
174

माझ्या जीवनात 

भेटलीत अनेक माणसे,

शिकवून गेलीत,

जगण्याचे फासले.....

सरड्यासही लाजवणारे

 रंग बदलणारे अनेक,

तर काही सप्तरंगाची

उधळण करणारे नेक....

घडतांना प्रवास जीवनाचा,

चटका देऊन गेल्यात काही आठवणी,

काही आठवणीनी शिकवली,

जीवन जगण्याची कला......

काही भेटले मतलबी,

काही जीव लावून गेले,

काही चटके देत,

काही फुल पेरून गेले....

माझ्या जीवनात मी,

खुप बघितले पसारे,

काही आनंदी क्षण,

त्याला दुःखाचे किनारे....

सुंदर ते जीवन फुलते गेले,

आपल्याची मैफील संजत गेली,

जे नव्हते आपले माळेत न मी विणले,

सोबतीचे गोड क्षण हारामध्ये मी गुंफले...


Rate this content
Log in