STORYMIRROR

Raakesh More

Others

3  

Raakesh More

Others

माझ्या भीमाने

माझ्या भीमाने

1 min
72

माझ्या भीमाने ज्ञानाचा

असा केला अभिषेक

त्याच्या ज्ञान किरणांने

लोप पावला काळोख


निद्रिस्त होता समाज

मनुस्मृती च्या छायेत

स्वाभिमान थकलेला

होता अस्पृश्य कायेत

शिकविले जिणे त्यांना

स्वाभिमानी रोखठोक


जातीवादी अंधाराने

जीवन ते झाकलेले

गुलामांचे जीवन ते

होते क्षीण थकलेले

केला होता कर्मठांनी

अन्यायाचा अतिरेक


गुलामांच्या गुलामीचा

त्याने अंत घडविला

मायभुमीच्या शिरेवर

घटना कळस चढविला

प्रस्थापून समता केली

समाजाची देखरेख


शिकून त्याने स्वतः

समाजाला शिकविले

माती नापीक तरीही

त्याने हिरे पिकविले

माझ्या भीमाने क्रांतीचा

असा केला उद्रेक


Rate this content
Log in