माझं स्वयंपाकघर
माझं स्वयंपाकघर
एक ठिकाणी असतो माझा मुक्त वावर
ते म्हणजे माझ्या घरातील स्वयंपाकघर
न चाले मला तिथे लुडबुड कुणाची
मक्तेदारी चाले तिथे फक्त माझी
नेहमीच्या पदार्थाना देते मी नवे रुपरंग
नवनवीन रेसिपी करण्यात मला
मिळतो आनंद
कधी इंडियन तर कधी इटालियन
कधी चायनीज तर कधी मेक्सिकन
ते खाऊन खुश होतात घरचे सारेजण
माझ्या हाताचे चिकन, फिश म्हणजे
मेजवानीच जणू
ते खाऊन सारे म्हणतात तू मास्टर शेफच जणू
पारंपरिक पदार्थान मध्ये माझा आहे हातखंड
सणासुदीला ऑर्डर असते बनव तू पुरी श्रीखंड
बाळ गोपाळांच्या आवडीचा बर्गर आणि पिझ्झा
बनवते मी घरच्या घरीच ताजा ताजा
आजी,आजोबांसाठी बनवते शेव पुरी आणि भेळ
सगळ्यांना आवडीचं खाऊ घालण्यात छान जातो माझा आनंदात वेळ
