माझं गाव आठवतंय मला
माझं गाव आठवतंय मला
1 min
185
त्या छोट्या छोट्या गल्ल्या अन मोठे मोठे वाडे,
चिरेबंदी असूनही कसे काय गेले त्यास तडे.
म्हातारे कोतारे बसायचे वेशी जवळच्या पारावर,
पोरं सोरं ही खेळायची त्या वडाच्या खोडावर.
बायकांचा असायचा डोक्यावर पदर,
येथे सारेच करायचे एकमेकांचा आदर.
माझं गाव अजूनही आठवतंय मला,
पोलीस स्टेशन माहित नव्हतं त्याला.
गावात होती ती एकशिक्षकी शाळा,
नसेल शिकायचं तर खुशाल म्हशी वळा...
