माझं बालपण
माझं बालपण
1 min
258
स्वप्नातील गारव्यात
आठवणींचा संग्रह उकलतांना
न कळतंच
बालपणात प्रवेश केला
झाकून आलेल्या ढगांतून
थेंबांची बौछार व्हावी
तसं मन गहिवरलं
आई विना पोरकं जगणं
अन् काही पोळलेल्या जखमा
साष्टांग जसच्या तसं बालपण
डोळ्या समोर उभं राहलं
तोच आलार्म खणखणला
अन् गच्चंकन जाग आली
जुन्या घड्याळातील तास काटा
पाचच्या अंकाला
तोंडात गच्च धरून
माझा चेहरा न्याहळत होता
लोकलची वेळ आठवली
तसं जीवन चक्राला गती देत
बालपणातून बाहेर पडलो
