माझिया माहेरी
माझिया माहेरी
1 min
217
माझिया माहेरी गं
खेळे अंगणी चांदण
लेकी बाळांना इथे
प्रेम मायेचे कोंदण
माहेरात चौसोपी
चार मजली वाडा
काका आजी आत्या
सारां नात्यांचा सडा
आईबाबा दादा वहिनी
स्वागताला उभे नित्य
जिव्हाळ्याचा हा बंध
जपती प्रेमाचं सातत्य
येता सय माहेराची
येतो भरूनच ऊर
जावे वाटते माहेरा
राहिले ते खूप दूर
कंकणाची किणकिण
माझ्या मायेची कानी
कलकल पाखरांचा
ऐकू मंजुळ त्या रानी
