माझी तुळशी माय
माझी तुळशी माय
दारी माझ्या अखंड उभी,
माझी तुळशी माय,
तुळशीशिवाय पांडुरंगास,
कसलीच माया नाय
तिचे लग्न लागल्याशिवाय,
शुभकार्य नाही,
पंढरीच्या वारीमध्ये,
डोई तुळसामाई
संजीवनी तू, बहुगुणी तू,
अनेक रोगांवर औषध तू,
तुझी पाने, मंजिरी, मुळी,
सर्वांत आहेस उपयोगी तू
सांजवेळी तुझ्यापाशी,
दिवा तेवत राही,
अखंड राहो सौभाग्य माझं,
प्रार्थना तुझ्या पायी