माझी शाळा
माझी शाळा
1 min
613
टणटण टणटण झाली घंटा
आवाज आला कानी मोठा
पाटी नि पेन्सिल घेऊन मी
निघालो शाळेत शिकाया।।धृ।।
दिवस पहिला शाळेचा
मोफत पुस्तके घेण्याचा
रंगीत चित्रे पाहाया।।1।।
शाळा माझी डिजिटल
नव्या गोष्टी कळतील
ज्ञानाची कवाडे खोलाया।।2।।
शाळा माझी सुंदर फार
झाडांची सावली गारगार
परिसराशी दोस्ती कराया।।3।।
खिचडी, उसळ, वरणभात
मोठ्या सुट्टीत बसतो खात
पूरक आहार तो खावया ।।4।।
गप्पागोष्टी, बडबडगाणी
गोड कविता ऐकतो कानी
मजेदार खेळ खेळाया।।5।।
बाई आमच्या फार गुणी
लाड करतात आईवानी
कुशीत त्यांच्या शिराया।।4।।
