माझी शाळा....
माझी शाळा....
लहानपणी जिथे जायचा येई कंटाळा ...
पण आता मात्र वाटतो हेवा ती म्हणजे माझी शाळा....
टुमदार इमारत तिला रंगाची झालर...
ओसंडून वाहे विद्येचा सागर...
खुप काही शिकवलं मला तिनी घडवलं...
दहा वर्ष मी तिथे घालवली...
वर्ग बदले शाळा मात्र तिच राहिली ..
कधी कधी वाटे नको हा अभ्यास नको ही शाळा..
पण शाळेने मला कधी दुर नाही केले आपल्या कढुन..
दहावीच्या समारोपप्रसंगी कळली तिची महती ...
एवढी वर्ष तिनी मला कवेत ठेवले तिला सोडून जाण्याची आली पाळी..
आता हक्क नाही राहिला तिच्या वरती हक्काने नाही जाऊ शकत कुठल्या ही वर्गात म्हणून मी विद्यार्थी नी....
आता खुप बदलली ती नव्या सुविधा सह सजली आहे ती ...
शाळेचं नाव घेतलं की भरुन येत ...
अभिमानाने मन बोलत अभिमान आहे मला तुझ्या छत्रछायेचा ....
