माझी पहिली कविता...
माझी पहिली कविता...
1 min
244
जुन्या डायरीची पाने आज
नकळतच मागे वळली
आणि माझी पहिली कविता
त्यातूनही कशी डोकावली
क्षणभर कशी आठवणीतले
आसवांची फुलेही तरळली
उगाच तिच्या शब्दांवरती
बोटे मग हळुवार फिरली
मन तिचेही भरेना अन्
शब्द सुचेना मग मलाही
तीच होती त्या क्षणाला
अन् माझ्याच सोबतीलाही
दुख-सुख कसे सर्व माझे
वाटुनी तिनेच मग घेतले
धैर्य या लेखणीत आज
तिनेच नव्याने कसे पेरले
पद्मा शब्दात खेळते फक्त
आजही जणू तिच्याचमुळे
मनातल्या वैखरीला वाचाही
खरी आली पहिल्या कवितेमुळे
