STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

माझी पायवाट

माझी पायवाट

1 min
255

थंडगार रेशमी धुक्यात

हरवली आज पायवाट

वेडावले मन हो माझे

पाहून सृष्टीचा हा थाट....


सोनेरी किरणांच्या सोबतीने

वाहणार्‍या वार्‍यावर झुलायची

हिरवा शालूसह पायवाट माझी

रेशमी धुक्यात नित्य नहायची......


भरकटलेल्या पावलांना

दिशा देते ही पायवाट खरी

आज हरवली आहे ती

जावू मी कशी माझ्या घरी?...,.


पावसात चिंब भिजतेय

चुकलेल्यांना वाट दाखवतेय

रणरणत्या उन्हात पोळतेय

दवबिंदुंच्यात आज मी तिला शोधतेय......


गुलाबी थंडी तनूला झोंबतेय

कोवळी सुर्यकिरणे हवी वाटू लागली

आता उगवला नारायण,गेले धुके निसटून

झपझप चाले मी पायवाट नजरेत आली.....


Rate this content
Log in