माझी नात
माझी नात
लगेच ती हसते, लगेच ती रडते,
लगेच ती खेळते, लगेच ती ओरडे.
क्ष्णा-क्षणाला ती किती आगळे-वेग़ळे,
भावछ्टा ती सारखी आम्हाला दाखविते.
हे सगळे बघुन मन माझे भारवते,
आजोबा होने अभिमानाचे वाटते.
तीच्या सोबत खेळावे,
तीच्या सोबत हसावे-रडावे.
तीच्या सोबत रमावे,
असे म्हणाला सारखे वाटते.
चिमुकलीने आपा म्हनाची वाट मी बघतो,
पण प्राकृतिक घटनेची वेळ निश्चित असते.
मानसाच्या हाती फ्क्त प्रतिक्षा असते,
प्रतिक्षे मध्येच मिळनारे खरे सुख असते.
प्रत्येक बाब वेळेपूर्वी भेटत नसते,
म्हणुन त्या वेळची वाट सर्वानाच असते.
