माझी मुलगी
माझी मुलगी
1 min
399
*सा*खरेपरी गोड वाटते माझी मुलगी,
*य*त्नांसाठी ध्येय ठेवते माझी मुलगी।।धृ।।
*ली*ला आणिक कला चमकती अंगोपांगी,
*श*रारती ती थोडी करते माझी मुलगी।।१।।
*शि*तल छायेत सत्वगुणांचे बोध मिळूनी,
*कां*चनापरी तेजस दिसते माझी मुलगी।।२।।
*त* त्पर असुनी मैत्रीसाठी धावत जाते,
*रा*ग लाडीक मनात धरते माझी मुलगी।।३।।
*ऊ*रामध्ये आपुलकीची माया धरुनी,
*त*त्वनिष्ठेत ठाम राहते माझी मुलगी।।४।।
