माझी माय
माझी माय
1 min
33
काळोखा आला अंगाशी,
कोणीच कुठे दिसेनात
सुन-सान आणि मी
मलाच काही उमजेना,
चुन-चून आला वारा,
आणि अंग कुडकचडू लागले,
मायेच्या नाजूक चादरीची,
आठवण करून थकलो
आसवांच्या धारा सोबत,
वाहून जावे लागते,
मायेच्या नाजूक हाताचे पाणी,
जेव्हा पाठीवरती आटले
भुकेलेले पोट घेेऊन कोणा घरी जाऊ,
तिच्या हाताचा घास
सोडून कोणा हाती खाऊ
