माझी माय मराठी
माझी माय मराठी
गोडवा माझ्या माय मराठीचा
गोडवा माझ्या माय बोलीचा असे अमृताहूनी गोड
कधी दृष्टीस पडती राकट रांगडेपणा
तर कधी होते माझी भाषा सौम्य मधाळ
ह्याच भाषेत रचियेले ज्ञानेश्वरांनी पसायदान
ह्याच भाषेत गाईले ओव्या मुक्ताई जनाईन
तुकोबांचे अभंग ऐकता जाहलो लहानाचे मोठे
छत्रपतींचे पोवाडे ऐकता स्वाभिमान मराठीचा हा जागे
बालकवींनी भुरळ घातली बालमनावर
फुलपाखरसम मन बागडती त्या कवितांवर
ह्याच भाषेने दिले आम्हास कुसुमाग्रज पु. लां सारखे दिग्गज
नटसम्राट आणि अंतू बरवा रडवती ,हसवती सहज
सावरकरांच्या कवितेतून भिनत्ती नसनसातून देशभक्ती
अभिमान जागवी लेखणीतून टिळकांचा कणखर केसरी
ह्याच मराठीच्या सुपुत्राने आणिले भारतात पाहिले चलचित्र
हारिश्चंद्राची कथा पोहोचली समग्र घराघरात
अशा थोर माझ्या माय मराठीला
करिते त्रिवार वंदन होऊनि मी नतमस्तक
पसरो माझ्या मायबोलीचा दरवळ विश्वाच्या कानाकोपऱ्यात विश्वाच्या कानाकोपऱ्यात
