माझी लेक
माझी लेक
1 min
277
गोड कळी एकदा
कुशीत माझ्या आली
देवाचं देणं मी
जीवापाड तीला जपली.
सोनपाऊली ती आली
माझ्या अंगणी बांगडली
तीच्या येण्याने माझ्या
मातृत्वाची आस फुलली.
गरिबीत ही माझ्या
मन भरून ती जगली
हळव्या मनाची ती
लाडाची लेक झाली
साधी भोळी बापडी
लळा लावती सर्वांना
ढोंगी दुनियादारी
ना कळली मना.
माझा काळजाचा तुकडा
देता दुसर्याच्या हाती
जीव झाला कासावीस
प्राण कंठाशी येती.
लेक मायेचा सागर
शिकवूनी करा साक्षर
ज्ञानाचा दिवा लावूनी
उजळील दोन्ही घर
एकच मागणे देवा
सुखी ठेव माझ्या फुला
तूच तीचा पाठीराखा
रक्षी वेळोवेळी तीला.
