STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

माझी लेक

माझी लेक

1 min
397


लेक माझी लाडाकोडाची

मौजमस्तीत रमणारी

शैशवात बहरणारी

अल्लडपणी रमणारी


प्रश्नांनी भंडावे मजला

विज्ञानाची आस तिजला

अंधश्रद्धा झुगारताना

शास्रीय ज्ञान हवे तिला


तारुण्यात चित्त स्थिरावे

ज्ञानोपासना ध्यास मनी

उच्चविद्याविभूषित व्हावे

हीच आकांक्षा ध्यानीमनी


खूप शिकूनी कर्तबगार

ज्ञानदानाचा असे निर्धार

पिढी पुढची घडवायाला

शिक्षक ज्ञानी आत्मनिर्भर


सावित्रीची लेक गुणी

पुण्य ज्ञानदान करी

सावित्रीचा आदर्श पुढे

गरीबांना सहाय्य करी


जन्म सार्थकी लागला

नाव काढले लेकीने

भाग्यवान मी जगती

दान दिले ईश्वराने


साहित्याला गुण द्या
लॉग इन