STORYMIRROR

Manda Khandare

Others

3  

Manda Khandare

Others

माझी कविता

माझी कविता

1 min
360

शब्दांतुन खळखळून वाहावी

यां हृदयातून थेट

त्या हृदयात पोहचावी

मनतील भाव, शब्दात मांडणारी असावी

अशी माझी कविता असावी


नऊ रसांनी नटलेली असावी

भावनांनी ओथंबून असावी

प्रत्येक रसात् चिंब भिजावी

शब्दांतून मधाळ वाटावी

अशी माझी कविता असावी


काळजाला प्रेमळ शब्दांची झालर असावी

शब्दांनी शब्दांसाठी मैफिल सजवावी

शब्दांनी शब्दांना शब्दांची दाद द्यावी

शब्दांनी शब्दांचे माहेरपन जापणारी असावी

अशी माझी कविता असावी


शब्दांना कुठली जात नसावी

हेव्या- देव्यातून ती हद् पार् असावी

प्रत्येक मनाचा ती ठाव घेनारी असावी

मनमनात ती हास्य फुलवणारी असावी

अशी माझी कविता असावी


Rate this content
Log in