माझी कविता
माझी कविता
1 min
320
सृष्टी सौंदर्य न्याहाळत,
शृंगारात रेंगाळत चाललेली,
दुःखाने पिचलेली,
अपयशाने खचलेली,
गुदमरलेला श्वास घेऊन,
भेदाभेद, कर्मकांडाच्या,
भोवऱ्यात गुरफटलेली,
माझी कविता,
सारे अडथळे दूर सारत,
डोंगर दऱ्या पार करत,
कडेकपारीतून ठेचकाळत,
सरितेच्या अवखळ प्रवाहाप्रमाणे
स्वतःचा मार्ग शोधून,
मार्गक्रमण करत निघालीय
माझी कविता!
होय!
तिला तिच्या स्वत्वाचा,
सत्याचा शोध लागतोय
जीवनाचा नवा अर्थ गवसलाय
ती निघालीय
नव्या वेशात
एका नव्या आवेशात
नव्या दमाने
साता समुद्रापार!
अटकेपार झेंडा रोवायला!
