माझी कविता
माझी कविता
1 min
493
काटेरी बंधन
कोंडलेली नाती
उगवणारा सूर्य
वितळणारा पारा
हे न संपणार ऋतूचक्र
आणि ह्या ऋतूचक्राचाच
एक भाग बनून गेलीय माझी कविता
क्षणभंगुर कवडश्यातल्या
मुक्या शब्दांना आकार देतेय कविता
डोळ्यांत समुद्र साठवत
किनाऱ्यावर ताटकळत उभी आहे कविता
उन्हान सोलून निघालीय कविता
काटेरी बंधनात अडकून पडलीय
निर्जण वाटेवर वाळलेल्या पिवळ्या
पानांच्या सड्यात सडलीय कविता
श्वासातच अडकून ऋतूची कविता सांगणारी कविता
अस्तित्वाचा कापूस पिंजणारी कविता
कधीकधी माझी होणारी कविता
आताशा तीच कविता काटेरी बंधनात अडकून पडलीय माझी कविता
