माझी अवस्था
माझी अवस्था
मित्र कोण,आणि शत्रू कोण
गणित साधे कळले नाही.....
नाही भेटला कोण असा
ज्याने मला छळले नाही.....
सुगंध सारा वाटीत गेलो
मी कधीच दरवळलो नाही......
ऋतू नाही कोणता असा
ज्यात मी होरपळलो नाही.....
केला सामना वादळाशी
त्याच्या पासून पळालो नाही.....
सामोरा गेलो संकटांना
त्यांना पाहून वळलो नाही.....
पचवून टाकले दु:ख सारे
कधीच मी हळहळत नाही.....
आले जीवनात कधीतरी सुख
कधीच मी हुरळलो नाही.....
कधी ना सोडली कास सत्याची
खोटयात कधी मुले नाही.....
रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेेच
काय करावे कधी समजलेच नाही!
