STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

माझी आवडती कवयित्री

माझी आवडती कवयित्री

1 min
1.1K

निरक्षर बहिणाबाई चौधरी

कमालीच्या होत्या कवयित्री 

निसर्गदत्त प्रतिभासंपन्न त्या

कवी सोपानांच्या जन्मदात्री


उत्स्फुर्त काव्यलेखनामुळे

प्रसिद्ध होत्या महाराष्ट्रभर

रचल्या अहिराणीत ओव्या

सुक्ष्म निरीक्षण ते काव्यपर


जगण्यातील सारे तत्त्वज्ञानच

त्यांच्या काव्यातून होई व्यक्त

संसार कापणी मळणी सण

जीवनानूभवच असे मुखोद्गत


आजही भावती समग्र ओव्या

सहजसोपी अशी काव्यबोली

घोळते हरेकाच्या तोंडी दावी

अन्वयार्थाने जीवनाची शैली


खऱ्या संसाराचे सारे वर्णनच

बहिणाईंच्या काव्यातून कळे

संसारातील सारी सुख-दु:खेही

तव्यातील भाकरीसोबत जळे


Rate this content
Log in