माझी आवड
माझी आवड
1 min
332
मला काय आवडते,
आवडते आनंदी रहायला,
आवडते खळखळून हसायला,
इतरांना मनापासून हसवायला.
आवडते गीत, संगीत
आवडे माझी काव्यप्रीत
कधी कधी लिहायला,
तर कधी गुणगुणायला.
आवडतो मैत्रीणींचा संग,
जिथे जगता येते जीवन बेधुंद,
वाहतो जेव्हा धुंद वारा,
विहरावे नभी पक्ष्यासम स्वच्छंद.
आवडतो कधी खट्याळपणा,
कधी लहानासारखा अवखळपणा.
आवडते साऱ्यांना समजून घ्याया,
तर कधी समजावून द्याया,
निसर्गाच्या कुशीत रमाया,
निसर्गाची किमया पहाया
रम्य तो निसर्ग आवडे पहाया,
आवडे मग स्वतःशीच रममाण व्हाया
