माझी आक्काआजी
माझी आक्काआजी
प्रेमळ , दयाळू /
शांत , समाधानी /
निर्मळचि मनी /
आक्काआजी / (1)
प्रातःकाळी उठे /
सडा नि रांगोळी /
गातसे भूपाळी /
मधुरचि / (2)
स्वयंपाकामधी /
रुचिरा , रसना /
तृप्त ती सर्वांना /
करीतसे / (3)
सख्या , मैत्रिणींचा /
समूह तिचाही /
चेष्टामस्करीही /
चालतसे (4)
स्वच्छतेची भोक्ती /
सदा असे लक्ष /
कामामधे दक्ष /
रहावेचि / (5)
गोष्टी नातवंडा /
रंगवून सांगे /
एकरुप होई /
सहजचि (6)
सांजवात लावी /
प्रार्थना देवासी /
निरोगी सर्वांसी /
ठेवा देवा (7)
हसूनी खेळूनी /
गप्पागोष्टी करी /
माळवदावरी /
चांदण्यात / (8)
आक्काआजी लाभे /
आम्हां दैवयोगे /
औक्ष तिजला गे /
उदंडचि (9)