माझी आई
माझी आई
1 min
276
आई माझी
बोबड्या बोलात
बाळाचे ग बोल
अंतरीची ओल
आई माझी
प्रेम अंतरात
मायेचा ग हात
भरवते भात
आई माझी
मायेचा निर्झर
अथांग सागर
देव साक्षात्कार
आई माझी
करसी कौतुक
जीवनी आकार
देतसे संस्कार
आई माझी
करी जागरण
कष्टकरी फार
उद्धरीले घर
माऊलीने
मनाचा आधार
जीवनाचा सार
प्रेम भारंभार
आई माझी
