STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

माझी आई

माझी आई

1 min
418

आई माझी कल्पतरू

आहे ती कनवाळू माय

आई पेक्षा मोठे माझ्या

जीवनात नाहीच काय


आईला भेटण्यास होतो

जीव इवलासा हा तान्हा

माझ्या मायेसाठी फुटतो

तिला वात्सल्याचा पान्हा


आईच्या प्रेमाला उपमा

नसतेच मूळी कशाची

आईच्या तुलनेपुढे असते 

किंमत शून्य या जगाची


माझ्या आईसाठी माझा

जीव ठेवला होता गहाण

तान्हेबाळ मी या मातेचे

तिची कीर्ती आहेच महान


ऋण झाले मला आईचे

सेवेचे पुण्य थोडे मिळवू

गर्भकळा सोसून प्रसवले

आजाररोगास दूर पळवू

 

माझ्या कातड्याचे जोडे

घालायचेत तुझ्या पायी

आयुष्यभर भक्तीपूजा

बांधायचीय माझ्या ठायी


Rate this content
Log in