माझी आई !!
माझी आई !!
आई विना भिकारी
साऱ्या जगात हे मानले
माझ्यापाठी खंभीरपणे उभ्या राहणाऱ्या
माझ्या आईला मी जाणले!!धृ!!
माझी आई……
सुंदर, सुरेख ,कर्तृत्ववान
स्व:कुटुंबाची आहे ती पालनहार
माझी आई माझा अभिमान
आमच्या कुटुंबाची आहे ती शान!!१!!
कष्ट माझ्या माईचे जन्मभराचे
शून्यातून उभे केलेले विश्व स्वतःचे
गरिबीतून जिने शिकवले गूढ जगण्याचे
असे हे कष्टकरी रूप माझ्या आईचे!!२!!
वेळोवेळी सावरलेस तू मला
रखरखत्या उन्हात जवळ घेतलेस तू मला
सत्याचा मार्ग दाखवत नेहमी
चांगल्यापरीने घडवलेस तू मला!!३!!
किती प्रेम करतेस ग आई
किती जीव आमच्यावर लावतेस ग आई
जीवनाच्या प्रत्येक वळण्या चालीत
सरळ मार्ग दाखवतेस ग आई!!४!!
अपुरा आहे हा जन्म आई
तुझी सेवा करण्याचा
प्रत्येक क्षण वा प्रत्येक दिवस
माझ्या डोळ्यांनी तुला आनंदी बघण्याचा!!५!!
हसत रहा नांदत रहा
आमच्याभोवती नेहमी बागडत रहा
मुक्त मनाने का होईना पण
एक गोड हसू आम्हाला देत रहा
आमची ताकद आहे तू आई
आमची शान आहे तू आई
ह्या रक्ताचं पाणी होईपर्यंत तुझी सेवा करेन ग आई
दुःखी तुला न कधी बघणार ग आई
हे वचन आज तुला देतो ग आई
हे वचन आज तुला देतो ग आई!!६!!
