STORYMIRROR

Savita Jadhav

Others

3  

Savita Jadhav

Others

माझे शब्द माझी लेखणी

माझे शब्द माझी लेखणी

1 min
609

शब्द माझे अंतरीचे,

  वाटे ठेवावे जपुनि...

त्यासाठी साथ देई,

  मला माझी लेखणी.


शब्द माझे सखे-सोबती,

  सदैव वसती अंतरी...

लेखणीला मिळे उजाळा,

  साथ देई परोपरी.


माझा श्वास माझे शब्द,

  लेखणी माझी निशब्द...

शब्द कधी बोलके,कधी अबोल,

उमटती रीतसर

   फिरता लेखणी गोलगोल.


माझे शब्द माझी संपत्ती,

  लेखणी तून नक्षीदार उमटती.

लेखणी शब्दांना न्याय देणारी,

  लेखणरूपी प्रवासात रंग भरणारी..


मनातल्या संवेदना व्यक्त करण्या,

  कल्पनारूपी माळ पिरोण्या

दोन्हीची सांगड बसली एकदाची,

शब्द आणि लेखणीची साथ मोलाची.


Rate this content
Log in