माझे सद्गुरू
माझे सद्गुरू
1 min
104
सद्गुरूंचे वर्णन मी पामर
काय आणि कसे करू?
थरकापलेल्या मनावर हळुवार फुंकर देती ते सद्गुरूं....
निराशेच्या अंधाऱ्या रात्रीला
लाख ज्योती उजळुनी ...
भक्ताला सामर्थ्य पुरवती
माझे थोर सद्गुरू
खंगलेल्या मनाला...
थकलेल्या शरीराला
नवी उर्जा देती सद्गुरू
रणरणत्या दुखाच्या वाळवंटात
भक्तावर अपार करुणेचा
वर्षाव करती सद्गुरू
ह्या घोर कलियुगात भक्तांना
विवेकबुद्धी पुरविती सद्गुरू
आपल्या भक्ताची कळकळीची हाक ऐकूनी
कठीण प्रसंगी नेती तारूनी माझे सद्गुरू
मी रजोगुणी मनुष्य कशी
महती वर्णन करू......
माझे सद्गुरू ...
माझे सद्गुरू ...
माझे सद्गुरू ....
