माझे गाव
माझे गाव
1 min
383
ते गांव सोडले मी
ते दार सोडीले मी
त्या गत काळाच्या गोष्टी
ती वाट सोडली मी
माझेच गणगोत आप्त
झाले कसे विभक्त
काळाचे पडता घाव
झाले होते स शक्त
घेवून ऊँच भरारी
नभी ऊडाला तो पक्षी
कोणीच उरले नाही
माझ्या गोष्टींचे ही साक्षी
काळ बदलला सरले पर्व
गतस्मृतींचा नुसता गर्व
चेहरा बदलला, रंग ही बदलले
माझ्याच घरात मुखवटे वेगळे
उरल्यात नुसत्या पावुल खुणा
माझ्याच गावात
मी अनाहूत पाहुणा..
काळजात आता चंद्रमोळी खुणा
