STORYMIRROR

Nalanda Satish

Others

3  

Nalanda Satish

Others

माझे बालपण

माझे बालपण

1 min
259

 ना पैश्याची चिंता 

ना जबाबदारीच सोंग

पोटभर अस्सल जेवण

ना नाशिबाचे भोग


घंटी वाजली की शाळेत जायच

आई आई करत स्वयंपाक घरात शिरायचो

भातुकलिचा खेळ सजवून

मोठेपणाचा आव आणायचो


छप छप छपाक पाण्यात खेळणं

टायर सोबत रस्त्यावर धावणं

तूप पोळी खाऊन कुशीत नीजनं

हट्ट करून खोटं खोटं रडणं


आजही बालपन जेव्हा

भातुकलिचा खेळ खेळते

वय विसरून मन

त्यात रमुन जाते


 बालपणीचा हां ठेवा

असाच मनाच्या कुपित जपुन ठेवावा

येणाऱ्या बालपणाला

भातुकलिचा वारसा द्यावा


Rate this content
Log in