माझे बालपण
माझे बालपण
1 min
170
माझे बालपण
रोप इवलंस माझं
घातलं रे खत पाणी..
सावलीत सदा ज्याचा
रोवलो येथे जीवनी..
आठवून आज माझं
बालपण जागी झालं..
छोट्या छोट्या पावलांनी
बघ मन धावू लागलं..
अकश्या मन्याची दोस्ती
बात निराळी मनाशी..
धागंड धिंगा मस्तीचा
बोले सगळे हवेशी...
हात ना अल्हाडपणाचा
आम्ही नाही कधी सोडला...
बाल विश्वी आमच्या रं
नडला तो नाही सुटला..
वाट पुन्हा मी जगावं
होऊन लहान तसा..
माझे बालपण मनी
नाही मोडला टसा...
नाही मोडला टसा..
