माझे बालपण
माझे बालपण
निष्पाप निरागस होते
माझे अल्लड बालपण
सुट्टीत आजोळी आजी
जपायचीच आपलेपण
प्रेमळ नि सुगरण आजी
बनवायची चविष्ट भोजन
दिवसभर खात सुटायचे
वाढायचे किलोनेच वजन
आवळे कैऱ्या आणि बोरे
जांभळे आम्ही पाडायचो
गाभूळलेल्या चिंचा दाताने
चवीने कराकरा चावायचो
मुक्त हिंडणे नव्हता अभ्यास
घालायचो रात्रीला तो जागर
आई-बाबांची नाही दटावणी
आजी माया ममतेचा सागर
दुधावरची मलईही सारीच
नातवंडांच्या पोटात जायची
वचन शपथा घालूनी आम्हां
आजी दूध प्यायला द्यायची
रोज दूध लोणी दही तूपाचा
पायंडा होता तिचा वाटायचा
शाळा सुरू होताच आमच्या
गळ्यात आवंढाच दाटायचा
