माझे बालपण
माझे बालपण
बालपण हवे पुन्हा मला
खेळायला नि बागडायला
नसे कशाची तमा न् चिंता
मौजमजा एवढाच धंदा
नसे भेद जाती-पातीचा
खेळावरच सगळे फिदा
खेळ आतुकली-भातुकलीचा
बाहुला-बाहुलीच्या लग्नाचा
वेगळाच थाट सोहळ्याचा
खोटं-खोटं जेवण्याचा
मनात नसे कसलाच स्वार्थ
काम सगळे निस्वार्थ
हट्ट धरलाकी सगळे मिळते
आई किती लाड-लाड करते
बाबांची तर लाडाची लेक
वाढदिवसाला हमखास केक
नसे अभ्यासाचे कसलेस टेन्शन
चिंचा-बोरांचे भारी कलेक्शन
गोट्या,कोया,चिंचोक्याचा खेळ
आम्हां पोरांचा भलताच मेळ
देवळात,बागेत फिरायला जायचं
आईस्क्रिम, भेळीवर ताव मारायचं
हरवले गेले खेळ सारे
मैञीला आता मुकली मुले
घातलाय घोळ मोबाईल अन् टिव्हीने
एकलकोंडी झाली सारी मुले
येतील का ते दिवस पुन्हा
खरचं बालपण देगा देवा
