STORYMIRROR

Sharad Kawathekar

Others

4  

Sharad Kawathekar

Others

माझे बालपण

माझे बालपण

1 min
246

कधीतरी एवढं वय वाढल्यावर

पुन्हा एकदा आज लहान व्हावंस वाटतंय

शांतपणे नानानानी पार्कात

हिच्या हातात हात धरून 

पुन्हा एकदा बालपण आठवाव्

त्या गाभुळलेल्या चिंचा खाव्यात

गावातल्या जत्रेत मिळणाऱ्या 

शिट्या मोठंमोठ्यान वाजत

गावभर जड्डी सावरत पळत राहायचंय

सर्कशीतल्या जोकरच्या वेड्यावाकड्या

हालचालीवर खळखळून हसायचंय

उडत उडत जाणाऱ्या 

कापसाच्या म्हातारी मागं 

पळत जावून तिला पकडायचय

माळरानावरून पकडून आणलेला

काडीपेटीतला विंचू पुन्हा पुन्हा 

ताईजवळ आणून सोडावा आणि 

आई बाबांचा ओरडा खावा

बाबांची खोटी सही मार्कशीटवर करावी 

दादाला म्हणांव "मी नाही देणार माझी लिमलेटची गोळी"

आणि गुपचूप ताईला चिमणीच्या दातांनी फोडलेली अर्धी गोळी ध्यावी

पण ......

आता सगळंच बदलय

वय वाढलंय

पोट सुटलंय

शुगरमुळं लिमलेटची गोळी खाता येत नाही 

सर्कशीतला जोकर भाऊगर्दीत हरवून गेलाय

सगळंच हरवलंय

माझं बालपण हरवलंय .... नानानानी पार्कातली लहानग्यात



Rate this content
Log in