STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

माझे बालपण...!

माझे बालपण...!

1 min
284

माझे बालपण....!

बालदिन म्हंटल की

चाचा नेहरू आठवायचे

आणि भाषणाच्या भीतीचे

काहूर मनात उठायचे....!

भाषणाला सर्वांनसमोर उभे राहता

पोटात गोळे उठायचे

त त प प पार पाडता अध्यक्ष महाशय

पूज्य गुरुजन आणि माझे मित्र बाहेर पडायचे...

हळू हळू पचन झाल्या सारखे

पाठ झालेले सारे ओकले जायचे

टाळ्यांच्या गजरात खूप कौतुक व्हायचे

शाब्बास शाब्बास ऐकायला मिळायचे...

दिवस सुट्टीचा मजेत जायचा

गोड गोड खाऊ मिळायचा

कॉलर ताठ करून गल्लीतून

सारा मित्रांचा लवाजमा फिरायचा...

आता सारी दुनिया नजरे आड

बालदिनाच मोलच झोपल गाढ

फोटोच्या चौकटीत आठवणी डोकावतात

आणि डोळ्यात आनंदाश्रु दाटतात..

तरीपण मुलांचं बालपण

सुखावून टाकत

जाता जाता आपल्यालाही

बालपण दाखवून जात....

बालदिनाच्या शुभेच्छा

सर्वांनाच द्याव्या वाटतात

आनंदात सर्वांनाच त्या सदैव

पिढयांपिढ्या चिंब चिंब भिजवतात...!

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!


Rate this content
Log in